Category: Philosophy

Absolute logic is not human cup of tea

We think we know the truth of many things.

We think we know the absolute truth of many things.

We think we know a lot.

We think we know.

But is really that the case?

We know nothing.

We believe many things

Video

 

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे – सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो.
==============================================================
सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर “सत्यच जिंकते” असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर. आपण जर या ब्रह्मांडाकडे (विश्व वा यूनिवर्स या शब्दांत भारतीय भावजगतातल्या अनेक संकल्पना नसतात म्हणून ब्रह्मांड) पाहिले तर जाणिव असलेले मानव ही स्पेसिस वा तत्सम इतर सजीव वा इतर काहीही आणि ब्रह्मांडातल्या कोठल्याही जागेतले तत्सम “प्रकार” सोडले तर, म्हणजे त्यांना ब्रह्मांडातून वगळले तर, असत्य नावाचा प्रकार कुठे उरत नाही. उरायला स्कोपच नाही. सगळं असत्य या सजीवांच्या विचारांत, मनांत, मेंदूंत, आणि कंच्या, इ इ आढळून येईल. याच्याबाहेर सांडलेलं असेल कोरडंफटक, रख्ख, मृत, नियमबद्ध वा कसं, अस्ताव्यस्त, अनिरीक्षित वास्तव विश्व. हे वास्तव म्हणजेच सत्य. हे जिंकते म्हणजे काय? कोणाशी त्याची लढाई चालू असते? कोणाशीही नाही! मग सत्यमेव जयते कशाला म्हणायचे? सत्यमेव वसते म्हणा किंवा सत्यमेव अस्ते म्हणा किंवा मराठीत सत्यच असते असे म्हणा!!!

आता हे गडबड गोंधळ करणारे सजीव सिच्यूएशन मधे घेऊन पाहू. त्यांच्या मनांत, मेंदूत अनंत सत्य, असत्य संकल्पना आहेत. परंतु सत्य संकल्पनांची नेहमी एक युद्धशील खुमखुमी आढळते. त्यांना असत्याचं पृथ्वीतलावरचं, ब्रह्मांडातलं नामोनिशान मिटवून टाकायचं असतं. या खुमखुमीतच सत्यमेव जयते चा जन्म होतो. मानवाने सत्याला अवाजवी महत्त्व देऊन ठेवलं आहे. सत्य हे साध्य तर नाहीच, पण मार्ग देखील नाही. ते फक्त एक टूल,परिमाण आहे आपल्या मानवजातीच्या उद्दिष्टांच्या पूर्तींतल्या मार्गांमधलं. म्हणजे विधान सत्य नसेल तर नीट वापरता येत नाही, मग त्या विधानाचा काय उपयोग असं काहीसं सत्याचं स्थान आहे. म्हणून ती एक आवश्यक बाब आहे, किचनमधे मीठ असल्यासारखं. तसं पाहिलं तर जीवनात गंतव्य सत्य “एवढंच” नाही, जायचा तो मार्ग सत्य “एवढाच” नाही. मार्गात वाटेल तेवढ्या असत्याच्या कुबड्या चालाव्यात. एक उदाहरण देतो. एका माणसाला मोठा उद्योग प्रस्थापित करून धनसंचय करायचा आहे आणि समाजासाठी रोजगार उत्पन्न करायचा आहे. हा एक सद्दुदेश मानू यात. मात्र या प्रक्रियेत त्याला कितीतरी प्रकारचा अनावश्यक सरकारी कंप्लायन्स करावा लागतो. सत्य असं आहे कि त्या व्यक्तिसाठी कंप्लायन्स अनावश्यक आहे. पण अन्य लोक गैरफायदा घेतात म्हणून तशी कायदेशीर तरतूद करणं देखील सरकारला आवश्यक आहे. या एकाच माणसाला सहुलियत दिली तर अन्य लोकांच्या मनातील संशय आणि त्यांच्या निराकरणाची आवश्यकता देखील सत्य आहे. अशी अनेक सत्यं या उद्दीष्टात, त्याच्या मार्गात कामाला येतात. पण आपण अशी अनेक चांगली कंप्लायन्स मॉनिटरींग अनावश्यक असलेली माणसं दुर्लक्षून काटेकोर कंप्लायन्सचे कायदे बनवले आहेत. इथे वेगवेगळ्या लोकांचं सत्य काय काय आहे, ते कसं कसं जाणायचं, कुठे कुठे मांडायचं आणि निर्दोषांना त्रास कसा होणार नाही हे कसं ठरवायचं याचं पूर्ण फ्रेमवर्क बनवायचं आणि सत्याचं अचूक पालन करायचं असंभव आहे. असलं फ्रेमवर्क लोकमान्य नसेल हे वेगळं आलंच. म्हणून सगळेच खोटारडे असू शकतात असा सर्वजनपतनन्याय लावायचा!

सत्याविना जग चालतं. आणि व्यवस्थित चालतं. तुमच्या मनातलं सगळं, सगळं सगळं, सग्गळ्ळं कधी सांगीतलंय कोणाला? चार सत्य फक्त आपल्यालाच माहित असतात. कोणतं सत्य कोणासाठी आणि दुसरं कोणतं सत्य कोणासाठी याचे हिशेब असतात. तरीही “मोकळी नाती” जुडतात, “मोकळ्या मैत्र्या” होतात. मग सत्याचा अट्टाहास का? कि चारचौघांना अलाईन होणारी ऑफिशियल पोझिशन म्हणून उगाच? माणसाचं स्वतःचं असं एक असत्य जग असतं. त्यात तो बर्‍याच गोष्टींत मुद्दाम असत्यपणे वागत असतो. हे अचाट आहे पण कधीकधी स्वतःशीही बराच खोटारडेपणा चालू असतो. आणि अज्ञान हा तर असत्यांचा महासागर. या महासागरात वाट हरवलेली लोकं देखील सुखेनैव संसार करत असतात. बरीच सत्यं भीषण असतात आणि लपून असतात. ती तशी लपून नसली तर कल्लोळ होइल. मग सत्याचा अट्टाहास का?
विश्वाचं, पृथ्वीचं, मानवजातीचं सत्य काय आहे हे कोणालाही माहित नाही. आपण का आहोत, आपण कुठे जात आहोत, कसे जावे इ इ प्रश्न अनुत्तरीत आहेत. सत्यवादी लोकांना विश्वाचं संपूर्ण ज्ञान हवं आहे. (कल्याणवाद्यांना ब्रह्मांडाचं कल्याण हवं आहे.). सध्याला हे ज्ञान घेण्याकरिता खूप श्रम घेतले जात आहेत, खूप पैसे ओतले जात आहेत. त्यात मानवाच्या कल्याणकारणाकडे दुर्लक्ष होत आहे. मंगलयान मंगळावर जातं आणि तिथेच शेजारी ओरिसातल्या आदिवास्यांना शेजारचं, भरून वाहणारं पाणी मिळत नाही. सत्यवाद्यांचा असा दावा आहे असा होणारा खर्च ही एक उद्याची गुंतवणूक आहे. ही गुंतवणूकीची जाहिरात बरेच दिवसापासून चालू आहे आणि त्याचा परिणाम काय आहे तर अजून गुंतवणूकीची मागणी. समजात दोन वर्ग आहेत. या सत्यवाद्यांच्या जवळचा आणि लाभार्थी. खूप पावरफूल. सत्ताधारी. दुसरा आहे कल्याणवाद्यांचा. निर्बल. दुर्लक्षित. आपलं सरकार देखील तोंडदेखलं कल्याणवादी आहे. त्याची जास्तीत जास्त संसाधनं सत्यवाद्यांच्या सेवेतच जातात.

सत्यवाद्यांनी नवे फॉर्म्यूले बसवले आहेत. कायद्यांचे. म्हणून कायदा हेच सत्य झाले आहे. कल्याण करायचं काम कायद्याचं आहे तर आपण मधे का पडा अशी वृत्ती निर्माण झालेली आहे. कायदे एकतर जीवनाच्या सर्व अंगाना स्पर्श करत नाहीत. तिथे सत्य काय ते प्रत्येकजण आपापला रँडमली ठरवत आहे आणि समाजात दुह्या, दुफळ्या निर्माण होत आगे. दुसरं म्हणजे कायदे जिथे स्पर्श करतात तिथे ते नीट राबवले जात नाहीत. प्रशासन असो वा लोक असो वा सरकार असो वा माध्यमे असो – कायदा कसा कमीत कमी पाळायचा याच्याच पळवाटा शोधत असतात. म्हणून कल्याणवाद्यांना फ्रस्टेशन आलं आहे. कायदा हा त्याच्या स्पिरिटनुसार पाळला पाहिजे पण सांगतो कोण?

आता कायद्याच्या बाजूनं विज्ञान आहे. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करायची विज्ञानानं चिक्कार शस्त्रास्त्रांची निर्मिती करू ठेवली आहे. म्हणून आहे ती व्यवस्था कल्याणकारी आहे असं समजून चालायचं आणि कायद्यात बदल करायचे. पण कायद्यात बदल संसदेत निवडून दिलेले लोक करतात; लोक थेट करत नाहीत. म्हणजे लोक विषयवार मतदान करत नाहीत, उमेदवारवार मतदान करतात. आणि प्रत्येक विषयात उमेदवारांत आणि लोकांत दुमतं असतात. हे सगळं सत्य मानायचं आणि चालायचं. या आणि सामाजिक गदारोळातल्या प्रत्येक विधानावर सांगोपांग चर्चा करायची, चिकित्सा करायची जे होत आहे ते कल्याणच होत आहे असं सत्य मानायचं. हा बराच विचित्र प्रकार आहे.

सत्याचं अजून एक प्रकरण आहे, ते म्हणजे सत्य ढोबळ असू शकत नाहीत. खणखणीत पुरावा आणि वाटरटाईट वाक्यरचना पाहिजे. मी जर म्हणालो कि मी थकलोय नि ते सत्य असेल तर आणि दुसर्‍याला तसे मानायचे नसेल तर मला मी थकलो असल्याचे त्याला पटतील असे पुरावे गोळा करावे लागतील. हे कठीण आणि अशक्य कर्म आहे. समोरचा दुराग्रही असेल तर अजूनच कठीण. मग मोजमापं आली. प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवणं आलं. त्यातून बनणारी गणितीय मानसिकता – आयुष्य म्हणजे गणित- आली.

जीवनाकडे पाहण्याचा, जीवन जगण्याचा दृष्टीकोन वैज्ञानिक बैज्ञानिक नसतो. नसावा. तो मूलतः कल्याणवादी हवा. माझं तुझं, सर्वाचं भलं होऊ दे, मग सत्य काही का असेना. उद्या जर सत्य असं निघालं कि सजीव सगळे निसर्गनियमांच्या कळसूत्री बाहुल्या आहेत (काहींना ते आजच वाटतं) त्या सत्याला पोचल्यानंतर काय? मृत बाहुल्यांचं काय करतात? इथे कोणीतरी कर्ता लागतो म्हणून मृत बाहुल्यांचं काय करतात ऐवजी काय होतं असं म्हणा. राहतात त्या पडून. ते निरर्थक पडून राहणं म्हणजे जीवन का? या असल्या अंतिम सत्यावर पोचल्यावर कसला जीवनविषयक दृष्टीकोन असणार आहे? आणि का म्हणे मानवी जीवनाचं सातत्य अबाधित राहावं आणि का म्हणे मंगळावर वस्ती कराणे?

सध्याला सत्य आणि कल्याण या संकल्पनांचं द्वंद्व चालू आहे. ट्रूथ वर्सेस बेनेव्होलेन्स!! बख्खळ सारी गृहितकं केली तर समाजात विवाद सत्यवादी नास्तिक आणि कल्याणवादी अस्तिक असा संघर्ष काही काळाने दिसून येईल असं मला वाटतं. सत्यवादी लोकांना पुरावा हवा असतो. पण पुराव्याला देखील त्याचा स्वतःचा पुरावा हवाच ना? मग ही साखळी कुठेच संपत नाही. शेवटी काहीतरी मानावं लागतं. निसर्ग वा वैश्विक अस्तित्व हे असम्यक आहे, त्यात ईश्वर नाही, ईश्वरीयता नाही, त्याचा कोणी कर्ता नाही, त्याचे काही उद्दीष्ट नाही, चांगुलपण आणि वाईटपण समानच आहे, आपण भौतिकशास्त्राच्या नियमांनी बद्ध आहोत, सगळ्या क्रिया, प्रक्रिया, भाव, भावना, मूल्ये ही भौतिकशास्त्रातल्या कणांच्या रिअ‍ॅक्शनचा परिपाक आहेत अशी विचारसरणी बळावत चालली. त्यात आपलं इतरांशी सदवर्तनाचं दायित्व प्रश्नांकित होण्याचा संभव आहे. “मी लोकांच्या कल्याणाची चिंता का करू?”, “लोकांच्या कल्याणात माझं देणं घेणं काय?”, “चांगलं आणि वाईट यापैकी चांगलं निवडावं असा शोध कधी लागला आहे??, “आपण मृत तर नाहीत ना?”, “हे जग नाहीच असे नाही ना?”, “कुटुंब, नाती, देश, धर्म , इ इ मूर्ख लोकांनी पुरातन काळात बनवलेली अनावश्यक ठिगळं आहेत.”, “मानवाला बुद्धी गेल्या १०० वर्षांत आलीय आणि त्यामागचा सगळा काही अंधार होता (म्हणजे आता माझ्यासारखे चार आहेत म्हणून सिच्यूएशन कंट्रोल मधे आहे.) म्हणून तिथलं सरसकट सगळं भलंबुरं न पाहता टाकावं” इ इ विचार करणारी मंडळी फोफावली आहेत.

मानवकल्याणाचा विचार हा शेवटी सामान्य माणसानंच करायचा असतो नि त्यात सत्याचा विजय होईपर्यंत ताटकळत बसायची गरज नाही.

The great India discussion forum (All languages and decent)

Please join this group to create India’s most responsible, serious, well-behaved, well moderated, intellectual, studied, analytical, advanced, open, patriotic, accommodative, philanthropic, and rigorous discussion forum. We promise to provide an atmosphere of respect, trust, good language, and accommodativeness. We aspire to get on board the most prominent names in politics, business, administration, legislature, judiciary, art, philosophy, science, technology, and other fields of knowledge with their real names.

There shall be no lobbies, sub-groups, noise, nuisance, abuses, insults, digressions, pressures, targeting, etc by any member at the second instance of considerable objection in the reasonable opinion of the moderators.

What do we discuss:
1. Society, social trends of India in specific (and the world in general if relevant) and the same way
2. Politics, legislative, judiciary, bureaucracy of India
3. Economy and business in India
4. Sciences (Physics, Chemistry, Biology, Mathematics, other sciences, pseudosciences, etc) and technology
5. Philosophy, God, spirituality, religion, naturalism, atheism, and similar abstract beliefs
6. History and geography
7. Industries and business processes
8. Finance and accounts
9. Current affairs
10. Critical analysis of an article, topic, writing,
11. Sports and games
12. Personal finance
13. Office, work, field affairs
14. Thoughts and questions in mind
15. Personal lifestyle
16. Social Media, gadgets, IT, HW, SW,
17. Arts (fiction, non-fiction, music, movies, drama, books, performances, and any type of performance), any other entertainment
18. Rural, urban and foreign
19. What is wrong and what is right
20. Language – science of language, structure, and other aspects
21. Any other topic not explicitly put in the negative list by the admin.

Following are the rules:
1. Only real persons can join.
2. The member must be at least one-year-old member of Facebook and should have minimum 50 friends.
3. No member can rejoin once expelled.
4. You can speak your mind without fear of being targeted. However, anti-national speak is not allowed.
5. No humor, sarcasm or parody is allowed to which objections are being raised. Not that we are against it, but there many other places for that.
6. The member must be an Indian citizen or person of Indian origin.
7. Discussions of topics that are in no way concerned with India or resident Indians are not allowed.
8. Opposite, neutral or own philosophies and thoughts to be held in basic minimum regard.
9. Members shall not hesitate in expressing themselves correctly and unambiguously.
10. Frivolous members shall be removed.
11. The promises herein are not constitutional nor contradictory to it.
12. Please set the notifications from this group to OFF
13. No short, curt, meaningless posts allowed.
14. One must first respect all the thoughts and the persons putting then and then support or criticize them.

India and Tarun Vijay Are Not racist.

 

The first video is mine shattering the view that either India or Terun Vijay are racist.

Second video is Al Zazeera video of interview of Tarun Vijay

 

 

 

The video of interview:

https://youtu.be/i_yz0dQmxak

Participants:

Mahesh Shantaram, photographer  : Passport   flasher

Sadiq : Victim                                                                                                                                                                 Salih – Indians are not racists

Mina Wumbey and Mahesh Shantaram :Majority Indians are racists, Black skin doesn’t make us less human beings, Some Indians are blacker than us (Africans), exact origin not known like Kenya, Nigeria                                                                                                                                                      They are us for marijuana?  Maintain African client list like Nigro 1 Nigro 2 Nighro 3                                                                                                                                         ===============

Crime levels,  Vulnerability  of microminority

Africans in India

Report: AFRICA-INDIA   Facts & Figures                2015                                                                                                                                                           BY UN and CII

 

What is the population of Africans in India?

The number of African students attending Indian tertiary institutions is  on a gradual increase since 2000, exceeding 6,000 in 2012.

 

From Sudan, Tanzania, Rwanda and Kenya accounted for more than 50%.

240,000 Tourists from africa

Residents?

Indians in Africa = Do we know Africa

As of January 2015, the number of Indians and persons of Indian origin living in Africa        was estimated to be 2.76 million which accounted about 10% of the total number of  overseas Indians and persons of Indian origin. In Africa, most of Indians and persons

of Indian origin were residing in South Africa (56%) and Mauritius (32%).     or 86%

Can we say Indians know Africans?

https://www.mea.gov.in/images/pdf/1-executive-summary.pdf

http://www.dailyo.in/politics/mahesh-sharma-racist-attack-africans-congolese-student-death-hauz-khas/story/1/10882.html

How are Indians treated in Africa?

Confusion between the whole and the Part

India , Africa, West – whole world? Racist?

Law and order problem

Self – Contradiction = Nobody in India who watched that liked that

Crime reporting in India

 

 

 

 

History of racism

https://en.wikipedia.org/wiki/Historical_race_concepts

 

 

 

Darwin and racism

 

 

 

Modern Scientific interest in racism

 

Phenotypic Variation[edit]                                                         

For more details on this topic, see Phenotype § Phenotypic_variation.                         

Phenotypic variation, which accounts for both genetic and epigenetic factors that affect what characteristics are shown. For applications such as organ donations and matching, phenotypic variation of blood type, tissue type, and organ size are considered.                        

 

 

Anthropometry[edit]                                                                   

Main article: Anthropometry                                                     

Anthropometry is the study of the measurements of different parts of the human body.[20] Common measurements include height, weight, organ size (brain, stomach, penis, vagina), and other bodily metrics such as waist-hip ratio. Each measurement can vary significantly between populations; for instance, the average height of males of European descent is 178 cm ± 7 cm and of females of European descent is 165 cm ± 7 cm.[21] Meanwhile, average height of Nilotic males in Dinka is 181.3 cm.

Applications of anthropometry include ergonomics, biometrics, and forensics. Knowing the distribution of body measurements enable designers to build better tools for workers. Anthropometry is also used when designing safety equipment such as seat belts.[20] In biometrics, measurements of fingerprints and iris patterns can be used for secure identification purposes.[22] As for forensics, patterns in anthropometry can be used to identify ancestry or race.[23]

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

http://www.nationmaster.com/country-info/compare/India/United-States/Crime

 

India                  USA

Age of criminal responsibility                                                      7                   6                  

                                                                                                                Ranked 50th. 17% more than United States    Ranked 58th.

Believes crime increasing in the past 3 years                       63.58            65.22           

                                                                                                                Ranked 49th.                    Ranked 44th. 3% more than India

Crime levels                                                                                       47.61            55.84           

                                                                                                                Ranked 45th.                    Ranked 30th. 17% more than India

Drugs > Annual cannabis use                                                      3.2%             13.7%          

                                                                                                                Ranked 4th. Ranked 1st. 4 times more than India

Drugs > Opiates use                                                                       0.4%             0.57%          

                                                                                                                Ranked 10th.                    Ranked 3rd. 43% more than India

Justice system > Punishment >Capital punishment (last execution year)                       2,013       2,014       

                                                                                                                Ranked 6th. Ranked 1st. The same as India

Murder rate                                                                                       2.8                5                  

Police officers                                                                                   122.5            243.6           

                                                                                                                Ranked 28th.                    Ranked 27th. 99% more than India

Rape rate                                                                                            1.8                27.3             

                                                                                                                Ranked 46th.                    Ranked 9th. 15 times more than India

Total crimes                                                                                       1.76 million                      11.88 million          

                                                                                                                Ranked 10th.                    Ranked 1st. 7 times more than India

Violent crime > Gun crime > Guns per 100 residents                    4.2                88.8        

                                                                                    Ranked 105th.                  Ranked 1st. 21 times more than India

Violent crime >Intentional homicide rate                    2.8                4.7               

                                                                                    Ranked 8th. Ranked 7th. 68% more than India

Violent crime >Murder rate                                        40,752          12,996         

                                                                                    Ranked 2nd. 3 times more than United States                                                                                    Ranked 9th.

Violent crime >Murder rate per million people           34.24            42.01           

                                                                                    Ranked 58th.                    Ranked 43th. 23% more than India

Violent crime >Rapes per million people                    18.39            274.04         

                                                                                    Ranked 46th.                    Ranked 9th. 15 times more than India

 

 

Is India Racist?

Crimes inseparable part

Special factors

Unsafe places

Company

Police visits

Systemic

Sensitization

 

Fair color

Mixing of cultures

The Aryan Invasion Theory

Dumped

Casteism

Origin

Measures

We hope it will go

Keep cultural identity

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

What is logic?

लॉजिक म्हणजे काय?
लॉजिकला आपण मराठीत तर्क म्हणतो. एखादे विधान वा वागणे वा कृत्य हे लॉजिकल म्हणजे तार्किक किंवा इल्लॉजिकल म्हणजे अतार्किक असते. तार्किक वागणे, विधान मनात, समाजात, कोठेही, अगदी वैज्ञानिक वर्तुळांत स्वीकार्य असते (अपवाद – मात्राशास्त्र). अतार्किक वागण्याची विधानांची खिल्ली उडवली जाते, त्यांना स्वीकारले जात नाही. इथेही भावनात्मक वा ज्याला आपण सेंटीमेंटल म्हणतो अशा वर्तनांचा अपवाद असतो.

पण शेवटी लॉजिक म्हणजे काय?
सर्वच तत्त्वज्ञानांची, म्हणजे अगदी विज्ञान धरून सर्वच तत्त्वज्ञानांची एक गोची आहे कि त्यांना कोणतेही सत्य केवल संदर्भात (अबसॉल्यूट काँटेक्स्टमधे) सिद्ध करता येत नाही. सिद्धतेच्या पद्धतीच्या अनंत उणिवा आणि मर्यादा आड येतात. गृहितकांच्यांच सिद्धतेच्या मर्यादा आड येतात. (खालचा उतारा ज्यांचं ते क्ष्रेत्र नाही त्यांनी वरवर वाचला तरी चालेल.)

हा विषय वैज्ञानिक नाही, पण आपण उदाहरण वैज्ञानिक घेऊ. आपण म्हणतो पाण्याच्या बाष्पीभवनाचे तापमान १०० डिग्री सेल्सिअस आहे. इथे हे विधान केवल सत्य मानण्यात अनंत अडथळे येतात. प्रथमतः हे विधान नीट लिहावे लागेल. म्हणजे पाणी म्हणजे संपूर्ण शूद्ध , १००% शुद्ध पाणी. त्यात कसली भेसळ नको. शिवाय समस्थानिकांची (आयसोटोप्स) भेसळ नको. साध्या हायड्रोजनच्या जागी ड्यूटेरियम वा ट्रिटीयम असले तर बाष्पांक वाढतो. ऑक्सिजनचंही तसंच असेल. आता इतकं शुद्ध पाणी मिळणार आहे का?
आता या प्रयोगासाठी बरंच काही सुस्थिर ठेवावं लागेल. म्हणजे वातावरणाचा दाब, पृथ्वीचे गुरुत्वाकर्ष, चुंबकीय, विद्युत क्षेत्रे, अजून काही काही. फक्त काळ तेवढा बदलून कोणतेही प्रयोगकर्ते परिस्थिती वा काँटेक्स्ट तसाच ठेऊन प्रयोग पुन्हा शकतात. दुसरं काही बदललं कि उत्तर बदललं.
वातावरणाचा दाब कसा स्थिर ठेवाल? तत्त्वतः जेव्हा पाणी हळूहळू बाष्पीभूत होतं तेव्हा त्याचे रेणू हवेत जातात तेव्हा हवेचा दाब तेवढ्याने वाढतो. मग दाब स्थिर ठेवण्यासाठी फार मोठी यंत्रणा (आणि तिचे लोचे) आणावी लागेल.
बाष्पीभवन करायचं पात्र कोणत्या आकाराचं घ्यायचं? फ्लेम कशी घ्यायची? पाण्याच्या सर्व रेणूंना समप्रमाणात उर्जा देणे कसे साधायचे? पाण्यात टेंपरेचर पॉकेट्स न बनवता हळूहळू तापमान १०० ला कसं न्यायचं? पॉकेट्स बनली तर आपण निष्कर्ष पॉकेट्सच्या सरासरीवर काढत आहोत आणि कदाचित कोण्या रेणूचा स्वतःचा बाष्पांक १०० पेक्षा वेगळा नव्हताच असे म्हणता येणार नाही.
बरं त्यात धातूत ठेऊन वा अजून कशात ठेऊन तापवलं, तर अत्यंत अल्प प्रमाणात त्या धातूचे रेणू पाण्यात मिसळतात आणि बाष्पांकावर परिणाम करतात.
बरं पाण्याचं तापमान १०० झालंय का हे पाहायला काहीतरी उपकरण लावावं लागतं आणि त्या उपकरणानं नक्की किती उर्जा घेतली आहे आणि त्यांनं दाखवलेलं तापमान आणि प्रत्यक्ष पाण्याचं तापमान यांत तफावत आहे कि नाही आणि किती आहे हे सुनिश्चित करता येत नाही. का? कारण या पाण्याच्या प्रयोगात पुढे जो फॉल्ट येणार आहे तोच फॉल्ट दुर्लक्षुन हे उपकरण, समजा थर्मोइलेक्ट्रिक तापमापक, बनवलं गेलेलं असतं. म्हणजे त्या थर्मोइलेक्ट्रिक इफेक्ट्ची सिद्धता अशाच मर्यादांच्या आणि गृहितकांच्या बँडबाज्यात झालेली असते. एक राडा तर इथेच झाला. शिवाय पाण्याची रिंडिंग घ्यायच्या आणि दाखवायच्या काळाचाही फरक पडतो. म्हणजे कधी किती तापमान होते हे ते इंस्ट्रूमेंट तत्क्षणी दाखवू शकत नाही. अगदी नॅनोसेंकदांत का होईना गॅप असतो.
बरं पुढे सामान्य तापमानालामाना पण पाण्याची वाफ होते. आपण कपडे नै का वाळवत? मग ते का? तिथं कुठं १०० तापमान असतं. मग शास्त्रज्ञ म्हणतात, वाफ होणं म्हणजे मूलतः रेणूंना जास्त गतीय उर्जा लाभणं. मग वातावरणाच्या हवेमुळे किंवा पाण्यांच्या रेंणूंच्या ब्रावनियन मोशन मुळे एखाद्या रेणूला १०० तापमानाइतकी उर्जा मिळते नि तो सटकतो. म्हणजे शंभर भिकार्‍यांच्या नेहमी उपाशी राहणार्‍या कळपात लोक अचानक दोघांना २-३ भाकरी, भाज्या देतात आणि ते अपार्टमेंटच्या लोकांइतके खाऊन झोपी जातात असा प्रकार.
मग असंच असेल तर बाष्पीभवन हे हळूहळू (ग्रॅज्यूअली) व्हायला हवं नि १०० ला संपायला हवं. तसं होत नाही. त्या त्या तापमानाच्या सॅच्यूरेशन पॉइंट इतकंच बाष्पीभवन १०० ला पोचण्यापूर्वी होतं. आता ९९ डिग्रीला हे बाष्पीभवन संपत यायला हवं, पण अजिबात नाही. १०० डीग्रीला लॅटेंट हिट अबसॉब होईपर्यंत जवळजवळ सारं पाणी पाणीच राहतं आणि १०० डिग्रीला भरमसाठे लेटेंट उर्जा घेतली कि मात्र सगळं पाणी बाष्प झालेलं असतं. इथे ग्रॅज्यूअलनेस का नाही? १०० पर्यंत का वाट बघायची नि मग १ बार प्रेशरलाच सगळं पात्र रितं करायचं? रेणूंमधली बलं कशाची वाट पाहत असतात. त्यांच्यात तो टूगेदर्नेस कुठून आला?

थोडक्यात काय कि पाण्याचे १०० डिग्रीला बाष्पीभवन होते याची “केवल” भौतिक सिद्धता आणि सर्व “केवल” कारणमिमांसा अगदी विज्ञानाला देखील अशक्य आहे.

सत्ये प्रस्थापित करण्यात प्रारंभबिंदूची समस्या येते. वरच्या उदाहरणात “एक बार दाबाखाली १ किलो पाणी १०० डिग्रीला बाष्पीभूत होते” हा जो नियम आहे त्याचे अनेक धागे आहेत. त्यात अनेक शब्द आहेत, नामे आहेत, क्रिया आहेत, विशेषणे नि इतर पार्ट्स ऑफ स्पीच देखील आहेत. आकडे देखिल आहेत. एकके देखिल आहेत. सामान्य जीवनातलं एखादं वाक्य घेतलं तर ते सोपं निघेल असं समजू नका. ती वाक्ये अजूनच किचकट असतात म्हणून विज्ञानाचा स्कोप त्यातली त्यात सोप्या गोष्टींचा असतो. “रामने शामला ५० पैसे दिले.” हे विधान अत्यंत किचकट निघेल.

प्रारंभबिंदूची समस्या म्हणजे काय? आता हे विधान केवल प्रतलावर सिद्ध करायचे तेव्हा त्यात वापरलेल्या प्रत्येक नामाची आणि क्रियेची व्याख्या अगोदर द्यायला लागेल. उदा. पाणी म्हणजे हायड्रॉजन आणि ऑक्सिजन यांचे संयुज. मग आता हायड्रोजन म्हणजे काय? ऑक्सीजन म्हणजे काय? सिद्धता द्यायच्या वाक्यातली सर्वच वाक्ये घेतली आणि सिद्धतेचा जो संदर्भ मांडला आहे ती सर्व वाक्ये घेतली आणि सारी गृहितके घेतली नि त्या वाक्यांतल्या प्रत्येक शब्दाचे, संज्ञचे अगोदर स्पष्टीकरण द्यायला लागेल. त्या प्रत्येक वाक्याला सिद्ध केल्याशिवाय शेवटच्या वाक्याची अबसॉल्यूट सिद्धता देता येत नाही. पण या सार्‍या पार्श्वभूमीचा गुंताळा प्रत्येक नव्या शब्दानिशी किचकट होत जातो. हा गुंताळा असा किती किचकट होतो? तर तो जगाच्या झाडून सर्वच संकल्पनांना वेटोळे घालून बसतो. साधे पाण्याचे बाष्पीभवन पण ते सर्व शास्त्रांच्या सर्व ज्ञानाला शिउन येणार, अपुरे मानणार. म्हणून मानवाला केवल ज्ञानाचा अभ्यासच करता येत नाही. कारण भौतिकशास्त्राचा कोणता नियम त्यातली त्यात सहजतेने लिहिता आला तर तो असेल नियमाच्या विधानाच्या अंति पेन उचलेपर्यंत घडलेला अखिल ब्रह्मांडाचा इतिहास!!! हे काही संभव नाही.

म्हणून मनुष्य कोणत्याही बाबीत कसल्याही केवल सत्याच्या सिद्धतेच्या भानगडीत पडत नाही. तो सरळ हजारो, लाखो, करोडो विधाने सत्य मानतो. ती खोडली गेलेलीच असतात पण व्यवहार्य फरक पडत नाही. म्हणजे बाष्पीभवन कसे का होईना, स्टीम इंजिन चालवायचे, भात बनवायचा, इ. खरं असो वा नसो, वैवाहिक लैंगिक निष्ठता पाळायची. आपण जे करू शकत आहोत ते आपण करू शकत आहोत तर त्यांमागचे विज्ञानाचे सारे नियम ऑटोमॅटिक व्यवस्थित चालत असतीलच कि!!!

आता तुम्ही म्हणाल, कि लॉजिक म्हणजे काय ते सांगताना या रामायणाचा काय संबंध? थोडक्यात काय तर संपूर्ण विश्वाचं, विश्वकारणाचं संपूर्ण, संलग्न, ( कंप्लीट अँड कंसिस्टंट) आकलन झालेलं नसलं तर कोणत्याच विधानाला काहीही अर्थ नाही हे मानवाला सबकाँशली माहित आहे. पण ते आकलन त्याच्या प्रत्यक्ष शक्तीबाहेरचं आहे. मग तो काय करतो, दणादणा खूप सारी सत्ये प्रसवतो, गृहितके करतो, संदर्भ सुनिश्चित करतो आणि विश्वाचं कंप्लिट आणि कंसिस्टंट आकलन झाल्याचा एक छोटा माहौल बनवतो.

हा माहौल म्हणजे लॉजिक. यातली सगळी विधानं १००% सत्य असतात. १००% पूर्ण असतात. ती एकमेकांशी काँट्रडिक्ट करत नाहीत. सवत्यानं. एकत्र. यांचं कोणतंही पर्म्यूटेशन , कॉबिनेशन पर्फेक्ट असतं. या विधानांचे सगळे व्यत्यास असत्य असतात. जर एखादा व्यत्यास खरा निघाला तर ज्या कलाकाराने हा माहौल बनवला आहे तो माहौल खराब होतो, यूजलेस होतो. तिथे आपण मग त्या “केवल सत्याच्या माहौलीफिकेशनात” झालेली गडबडी दुरुस्त करून गाडी पुन्हा रुळावर आणली जाते.

तर लॉजिक म्हणजे सुसूत्र सत्य विधानांचा संच. जर केवल सत्याच्या नजरेनं पाहिलं तर जे सत्य आहे ते सुसूत्र असणारच आणि जे सुसूत्र आहे ते सत्य असणारच. पण ती फॅसिलिटी आपल्या “मौहौलिक” लॉजिकाला नाही.

Biti Na Bitai Raina (बिती ना बिताई रैना)

ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत – दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्‍यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.

सगळं जग स्वार्थी असतं मात्र त्यात एका निस्वार्थ नात्याला जागा अवश्य असते. नेमकं तेच नातं ईश्वराला पाहवलेलं नसतं. मात्र नसलेली व्यक्ति नाही असं प्रत्यक्षात नसतंच. रात्रीच्या एकांताच्या वेळी ती हरवलेली व्यक्ति इतकी प्रतिक्रियाशील होऊन जाते कि ती नाहीये असा निष्कर्ष काढणं अवघड होऊन जातं. ती कशी दिसेल, कशी बसेल, कशी बोलेल, काय बोलेल, काय करेल, तिने काय घातलेलं असेल, तिचे अविर्भाव कसे असतील, ती कशी वागेल हे सगळं इतकं सुस्पष्ट ठावं असतं कि हे सगळं आपण कल्पना करतोय हे देखील विसरून जायला होतं. तिथे बाह्य जगाच्या दृष्टीनं जो एकांत आहे त्याचं अनुभवकर्त्यासाठी खर्‍या अर्थानं सहवासात परिवर्तन झालेलं असतं. ही विरहदायी व्यक्ति कोणाची आई असेल, पिता असेल, पत्नी असेल, मित्र असेल, प्रेयसी असेल वा अजून कोणी असेल; अस्सल प्रेमाच्या ठिकाणी ही रात्रीभेट कधीकधी अवश्य होते. ही विरहकर्ती, ती अदृश्य भेटकर्ती आणि त्यांचं भावविश्व कसं असेल हे डोकाऊन पाहावयाचं असेल तर बिती ना बिताई रैना हे गाणं एकवार एकांतात बसून अवश्य ऐकावं.

१९८७-८८? तेव्हा मी सातवी-आठवीत असेन. आमच्या घरमालकाच्या पोरींबरोबर उदगीरमधल्या कॅटल क्लास वस्तीतून मी दुधाच्या केटल्या घेऊन नविन बंगल्याबंगल्यांच्या सुखवस्तू निडेबन वेशीकडं जायचो. तिथे एखाद्या त्यातल्या त्यात फ्रेंडली बंगलेवाल्याकडं सगळ्या केटल्या टेकवायच्या नि त्या पोरींचं दूध वितरण चालू व्हायचं. कदाचित दुधाच्या नफ्यात मला हिस्सा नाही म्हणून पायपीट करायचे कष्ट मला न देता तिथेच बसून केटल्यांचे संरक्षण करण्याचे सोपे काम मी करावे असा विचार त्या करत आणि मी कदाचित पोरींचा सहवास हाच पुरेसा मोबदला मानत असेन. त्या उच्चभ्रू लोकांच्याकडे टीवी असे नि घरात प्रवेश नसला तरी बाहेरूनच खिडकीतून आत पलंगावर बसलेल्या लोकांच्या मानांमधल्या दर्‍यांतून त्यांच्या फुलझाडांच्या कुंड्यांमधे पाय ठेवायला जागा शोधत टीवी पाहण्याची मुभा मला होती. अशा प्रकारे मी खिडकितून टीवी पाहत असताना पहिल्यांदा मला टीवीतही खिडकीतून पाहणारी ती पोरगी नजरेस पडली. तिच्या घरातल्या त्या पापुद्रे आलेल्या भिंती, काही जागी टवके पडलेले, त्या भिंतींचा उडालेला रंग, घरात इतकंही काही नीटनीटकं न ठेवलेलं सामान, घरातले अंधारलेले कोपरे, आजारलेलं एक माणूस आणि अगदी साधे कपडे घालून मेकप न करता बसलेली एक साधी पोरगी – हे सिनेदृश्य असलं तरी भपकेबाज असं काहीच नव्हतं त्यात. उलट एक खूप जवळीक वाटलेली. आजही वाटते. घरी येणारांसमोर घर एका विशिष्ट प्रेझेंटेबल अवस्थेत असावं असा हव्यास बरीच मंडळी धरतात नि भेटीगाठीच टाळतात हे निदर्शनाला आल्यापासून या पोरीच्या घराबद्दलची आपुलकी थोडी वाढलीच आहे.

बीती ना बिताई रैना, बिरहा की जाई रैना
भीगी हुयी अँखियोंने लाख बुझाई रैना

त्यावेळेस मला रैना म्हणजे काय ते माहित नव्हतं, आता मला रैना शब्दाचा मी तेव्हा काय अर्थ काढायचो ते आठवत नाही. पण काहीतरी संपत नाहीय असं ती म्हणतेय हे कळे नि नक्कीच ते सुसह्य नव्हतं हे तिच्या नि तिच्या पित्याच्या भावसंवादातून उमजे. रैना म्हणजे काहीतरी विझवायची ज्वालाग्राही गोष्ट असावी. आणि ती ज्वाला विझली कि शांत झोप येत असावी. मात्र कितीही रडून झालं तरी ती ज्वाला काही विझत नाहीय इतका त्या मुलीला आपल्या आईचा विरह होतोय. आता चाळीशीत आल्यावर मला कदाचित लोकांना आई नसण्याची सवय झालीय. म्हणजे क्रिकेटमधे आपण टॉस जिंकतो वा हारतो, नाणं पाहायचं, अल्पसं हळहळायचं नि पुढे कामाला लागायचं. तशी कोणाला आई असते वा नसते, ऐकायचं, ‘ओह सॉरी’ म्हणायचं आणि पुढे कामाला लागायचं. तसं तेव्हा नव्हतं. एखाद्याला आई नसणं म्हणजे नक्की काय काय नसणं हे तेव्हा कळत असे नि व्यक्तिच्या दु:खाची संपूर्ण अनुभूती येत असे. प्रेमगीतं आवडायचं वय ते (तुम्हाला हे थोडं लवकर झालं असं वाटेल, पण असो तो विषय), पण त्या मुलीनं आपल्या देवाघरी गेलेल्या आईला गायलेली ही बॉलिवूडी रॅरिटी मला फार भावून गेली. आई नसणं म्हणजे फक्त मातृदत्त सुखं नसणं ही माझी अनुभूतीची मर्यादा हे गाणं त्या कोवळ्या वयात विस्तारित करून गेलं. भविष्यात मिळणारी सुखं गेली ते गेलीच मात्र भूतकाळात मिळालेली सुखं देखिल पिच्छा सोडत नाहीत. ती वारंवार त्यांचा नॉन-रेप्लिनेशेबलपणा कसा अद्वितीय आहे हे सांगून पिडतात. ते तर सोडाच, भूतकाळात ज्या सुखांना सुख हे लेबल लावलेलंच नव्हतं ती सुखं वर्तमानात देखील त्यांचे चेतासंदेश किती प्रबल आहेत हे वेळोवेळा सिद्ध करतात.

बीती हुयी बतियाँ कोई दोहराये
भूले हुए नामों से कोई तो बुलाये
चाँद की बिंदी वाली, बिंदीवाली रतिया
जागी हुयी अखियों में रात ना आयी रैना

इंजिनिअरिंगच्या परीक्षा संपल्यात. पुण्यावरनं लातूरला जाणारा मी एकटाच आहे. एक महिन्याची सुट्टी आहे. लालडब्ब्याची बस इंदापूरपुढे कुठेतरी एका ढाब्यावर थांबते. सलग तासंतास बसून कंबरडे ताणलेले सगळे प्रवासी तिथे उतरतात. ढाब्यावरही आणि बसमधेही फार काही लोक नाहीत. हायवेवरून ४-५ मिनिटांनी एखादी गाडी जातेय. ढाब्यापुढे बाजा मांडलेल्या आहेत. दणकून भूक लागलेली आहे. बाजूला एखादं कुटुंब एकमेकांना आग्रह करण्यात, खाऊ घालण्यात मग्न झालं आहे. सगळीकडे अंधारलेलं आहे. ढाब्याच्या प्रत्येक खाटेला एक कंदिल दिला आहे. फक्त काउंटरवर विजेचा दिवा असावा. कमीत कमी बिलामधे जास्तीत प्रमाणात नक्की काय येतं इतका मेनू परिचय नसल्यामुळं नि वेटरला तसं थेट विचारणं हिमतीबाहेरचं असल्यामुळं माझं देखील काहीतरी ऑर्डर करून झालंय. शिवाय किती मिनिटात जेवण उरकायचं आहे त्याची धास्ती कंडक्टरने लावून दिली आहेच. तितक्यात ढाब्याच्या खांबावर लटकावलेला रेडिओ त्या न सरणार्‍या रैनेचं गीत गाऊ लागतो नि माझं या गीताचं दुसरं श्रवण चालू होतं. यावेळेस मात्र मी पहिल्यापेक्षा फार स्मार्ट माणूस झालो आहे. कॉलेजमधल्या हिंदी मुलांमुळे माझी हिंदी पक्की झाली आहे. तिला आता कोणी हसत नाही. काश्मिरच्या रैना आडनावाच्या मुलानंच मला रैना म्हणजे रात्र असा अर्थ सांगीतलेला आहे. गाण्याच्या प्रारंभीच्या तंतूवाद्याच्या आघातांची ताकद अफाट आहे. त्या एकेका आघातामधे काहीतरी गूढ, गुह्य, गुप्त आहे. त्या एकेका पडघमामधे हृदयाचा एकेक कप्पा खोलत आतवर खोल शिरायचं सामर्थ्य आहे. त्या ढाब्यावरच मला माझं हृदय अंतर्बाह्य दाखवलं जातंय. वास्तविक माझ्या आयुष्यात कोणीही माझ्यापासून तसं दूर गेलेलं नाही. टच्चूड, पण माझी स्वतःची आई तर अगदी धडधाकट आहे. पण तरीही गाणं ऐकताना काहीतरी कालवाकालव होतेय. हे जितकं मातृविरहगीत आहे तितकंच ते भावविरहगीतही आहे हे मला जाणवतं. मी मला नक्की काय सोडून गेलं म्हणून सैरभैर होऊन शोध घेऊ लागतो. सात्विक, समाधानी लोकांच्या हरितप्रदेशातून मी कोरड्या, असंतुष्ट लोकांच्या मरुभूमीत येऊन पडलोय का? लहानपणीची गावं आपण नक्की कशासाठी सोडली? आपण जिथे आहोत तिथलं सगळं आपल्याला आवडतं का? आजूबाजूचं सगळं आवडायला हवं असा विचारच विपरित आहे असं मानणार्‍या लोकांत कदाचित आपण केवळ स्वतःसच स्वतःचं कुढणं माहित असलेले ‘सामान्य’ व्यक्ति तर नाहीत? आपण वयाने मोठे झालो आहोत म्हणून असं होतंय कि आपण स्थलांतरित झालो आहोत म्हणून असं होतंय? जास्त जाण आली कि जगाचा वाईटपणा जास्त प्रकर्षानं जाणवायला लागतो. तसं झालंय का आपलं? मूळात सगळं चांगलंच आहे, वा सगळं चांगलंच होईल, वा सगळं चागलं आपण स्वतः करू शकू असा शाळकरी आशावाद आता चार सहा महिन्यांत जबाददारी अंगावर घ्यायची वेळ आली आहे तेव्हा मूर्खपणा का वाटतोय? जगासाठी आपल्याला काय काय करायचं होतं? ते सगळं करण्याला आपण मुकून एका सिमित चक्राला बांधले जाणार. अस्वस्थ करत होतं सगळं. एरवी मन विषाची सवय झालेल्या शरीरासारखं असतं, पण हे रात्रीगीत ऐकलं कि ते गाणं ते विष सगळं ढवळून काढतं आणि ते चांगलंच उफाळून येतं, भिनतं. ती रात्र खरोखरंच अवघड असते. खिडकीतून मी अंधारच्या सावल्या पाहत मी मी, लोक, जग, ईश्वर कोण कुणीकडे का चाललंय याचा विचार करत असतो, बस लातूरकडे मार्गस्थ झालेली असते. सकाळी मी फार थकून उठलेला असतो, न जाणारी रात्र खरोखरीच फार लांब असते याची पहिली सिद्धता मला मिळालेली असते.

युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए

पेट्रोल नि डिझेलचा वास मारणारी गोंगाटी शहरं मला आवडत नाहीत म्हणून मी कूलू नि मनाली दोन्ही शहरं गैरसोयीची पडावीत अशा मधल्या जागी थांबलोय. हे वातावरण दिल्लीच्या दमट, उष्ण आणि रोगट वातावरणाच्या माणसासाठी स्वर्ग आहे. बायको, मुलगा, मित्र, त्याचे कुटुंबीय यांच्यासोबत खूप भटकंती केलीय. हिमालयामधे कार चालवण्याचा आनंद घेतला आहे. संध्याकाळचं जेवण झालंय. अंती तोंडात क्षणात विरघळतील असे टपोर गुलाबजाम खाऊन झालेत. त्याचा सुवासिक पाक देखील मनसोक्त चाटून झालाय. सूर्यास्त केव्हाचा झालाय नि समोरची बर्फाच्छादित पहाडे दिसताहेत कि नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या खूप खूप खाली एखादा दिवा तिथे काहीतरी आहे याची साक्ष आहे. मी एकटाच बाहेर फिरायला आलोय. मी खूप थकलोय, पण रात्रीचं, एकांताचं, शांततेचं सौंदर्य पाहायचं अजून उरलंय. अलिकडे एकांत मिळणं बंदच झालेलं आहे. मागे एकट्यानी कधी काय केलं ते आठवतच नाही. कष्ट, कर्म, ताण आणि सुख, स्वच्छंदीपणा यांनी आठवड्याचं आणि वर्षाचं २:५ आणि ३०: (३६५-३०) असं आपापसांत विभाजन करून घेतलं आहे. त्यातला सुखकाल चालू आहे म्हणून मी जाम खुष आहे. वस्तीपासून दूर मी एका दगडावर येऊन बसतो. खाली खोल घळईत दोन उंचच्या उंच समांतर पर्वतांच्या रांगांमधून व्यास नदीचा ओघ वाहत आहे. पाण्याचे अणूरेणू हातात हात घालून एकमेकांना जुन्यापुराण्या प्रवासाच्या गोष्टी सांगताहेत. दिवसा भीडेने चेपलेल्या त्या कणांना रात्रीच्या वेळी खूप आत्मविश्वास आला आहे. बेरात्री घाटांमधे निघालेल्या एखादा द्वाड ट्रक त्यांना बोलण्यात व्यत्यय न होईल याची काळजी घेत गुमान चालला आहे. त्याचा वाहता प्रकाश नागमोडी वळणांच्या रस्त्यावर कधी दिसतोय, कधी दिसत नाहीय इतकीच काय ती त्याच्या असण्याची साक्ष. त्या प्रकाशात उजळून निघालेली झाडं त्या वाहनाला आपल्या विस्ताराची, रादर त्याच्या क्षुद्र आकाराची, अहंपूर्वक जाणिव करून देतात नि क्षणार्धात गडप होतात. हा लपंडाव पाहत मी बराच वेळ पाण्याच्या कणांचं बोलणं ऐकत असतो. त्यांना कुठं जायचं असेल? त्यांचा प्लॅन काय? त्यांना अथांग महासागरात कुठेतरी पडून राहायला जास्त आवडत असेल कि कोण्या झाडाच्या मूळातून पानाकडे शिरायला आवडत असेल? आम्हा माणसांबद्दल त्यांचं काय मत असेल?

अशावेळी सहसा मी गाणी ऐकतच नाही नि ऐकली तर भावगीतं ऐकतो. पण यावेळेस का कोण जाणे, वाटलं आपल्या यादीतल्या शेकडो गाण्यांपैकी एखादं गाणं रँडमली वाजवावं. कमाल म्हणजे पुन्हा व्हायोलिनवर बिती ना बिताई रैना चालू झालं. (https://www.kkbox.com/hk/en/album/Cx-a6FsPk5fBGu0FG4Oo0091-index.html) आवडीचं म्हणून हे गाणं कित्येकदा ऐकलं होतं, मात्र वाद्यसंगीत म्हणून क्वचित. पुन्हा ते पडघम वाजले नि अंतःकरणाची सगळी पटलं उघडली. तसा मांजर जसं दूध पितं तसं मी हे गाणं ऐकतो. ते दूध देणारी गाय कोणती, ते गरम कोणी केलं, थंड कोणी केलं, बशीत कोणी घातलं, आणून कोणी दिलं याच्याशी मला काही देणं घेणं नसतं.

काळ नावाचं असं सवतं काही असतंच का? या ब्रह्मांडाच्या बाहेर नेऊन न्याहाळून पाहू शकू असा काळ नावाचा कोणता पदार्थ आहे का? कि जे सामान्यतः इंट्यूशन होतं कि अन्य बाबींतील बदलांच्या गतींचे जे परस्परसंबंध आहेत त्यांच्यावरच काळ असण्याचा सोयीचा आरोप केला गेला आहे? आईनस्टाइननं तर काळ आणि अवकाश यांचं संयुज असतं आणि ते वाकतं, मंदावतं, थांबतं, धावतं असं सांगीतलं आहे. जगातल्या सर्वात बुद्धीमान माणसानं सांगीतलं आहे तर काळ नावाचं एक सवतं सत्य असावं खरं. काळाचा हा सापेक्षतावाद मला कधीही झेपला नाही. पण रात्र सरण्यामधला सापेक्षतावाद जो कवीनं सांगीतला आहे तो चटकन उमजतो नि भावतो. युगं सरतात पण आठवणींचे काही क्षण त्यांच्यापेक्षा दीर्घायुषी वाटतात. तशी आयुष्याची डिटेल्ड समरी करायला सांगीतली तर माझं तास दोन तासांत सांगून होईल, पण अशा काही मोजक्या आठवणी आहेत, मी मलाच सांगत राहीन आणि माझ्यातलाच एक दुसरा मी ऐकतच राहील आणि ती गोष्ट कधीच संपणार नाही. आता मी अशा क्षणांचं रवंथ करायला चालू करतो. विसरलेले क्षण, न विसरता येणारे क्षण, विसरलेले लोक, न विसरता येणारे लोक, आयुष्यात विशेष स्थान असलेल्या जागा, परतून न जायच्या जागा, विसरलेल्या सवयी, विसरलेले स्वभावपदर, न विसरता येण्यासारखे काही जणांचे शब्द, … बरंच काही आठवत राहतं. मनात एक काहूर उठतं. हे गीत जितकं विरहगीत आहे तितकंच ते वादळगीत देखील आहे. आठवणींच्या पिटार्‍यातून कितीतरी सिनेमांच्या क्लिप्स रिमिक्स होऊन अव्याहतपणे सुसाटपणे डोळ्यासमोर पळायला लागतात. पापण्यांच्या खालच्या पेशींना मेंदू संदेश देणारच असतो तितक्यात बायकोचा फोन येतो नि वादळ शमवून मी हॉटेलकडे चालू लागतो. तिच्या पदराखाली मी ५-१० मिनिटानी निवांत झोपणार असतो. किमान हिच्या आठवणींत मला हे गाणं कधीच ऐकायला लागू नये असं इश्वराला मनोमन घोकत मी हॉटेलमधे पोचतो नि हुरहुर शांत झाल्यावर रैना नकळत सरून जाते.

झूठ से काली लागे, लागे काली रतिया
रूठी हुयी अखियों ने, लाख मनाई रैना

घरात मी एकटाच असाच टीवीचे चॅनेल चाळत असतो. परिचय, हे गाणं ज्यात आहे तो सिनेमा लागलाय. सिनेमा पाहावा का ठेवावा असा विचार मी करतोय. भावूकतेचे जास्त संदर्भ माहित झाले तर भाव कोरडे होतात असा अनुभव आहे. नेहमीप्रमाणे आल्याड पल्याड करत मी मधे मधे काही सीन पाहतोय. आपल्या मातेला नि पित्याला आपले कठोर हृदयाचे आजोबा घरातून काढून टाकतात म्हणून मनात अढी ठेऊन असलेल्या नातीस त्या कठोर आवरणाखाली दडलेल्या आजोबांच्या मृदू, प्रेमळ आत्म्याचा परिचय होतो अशी छोटीशी कथा! त्यातल्या नातीने नि तिच्या वडिलांनी त्यांच्या बिकट परिस्थितीच्या काळात मरण पावलेल्या आईच्या आठवणीत हे गाणं. पुन्हा तंतूनाद होतात नि पुन्हा हृदयाचे कप्पे उघडले जातात. एकटं गाठून माझ्या अंतःकरणाला निर्वस्त्र करण्याची या गाण्याला सवयच जडलीय. आयुष्यात फार काही शत्रूसंग्रह केलेला नाहीय परंतु ज्यांच्याबद्दल अवधारणा आहेत असे लोक नाहीतच असं नाही. आपण खरोखरच लोकांशी न्याय्यपणे वागलो आहोत का असा विचार मी करतो. एकेका प्रतिमापतिताची फ्रेम माझ्या डोळ्यासमोरून सरकतेय. अगोदर चांगले वाटलेले, नंतर वाईट वाटलेले. अगोदर वाईट भासल्याने दूर ठेवलेले, नंतर फार छान निघालेले. गळेपडू म्हणून तिटकारलेले. कोरडे म्हणून टाळलेले. इन्कंपॅटिबल म्हणून चार हात दूर ठेवलेले. जोखमीचे वाटले म्हणून अव्हेरलेले. हलकीशी घमेंड दाखवल्यामुळे आयुष्यभरासाठी मित्र बनण्याचे पोटेंशिअल नाही असे मानलेले. मी चांगले वागत असतानाही तिढा ठेऊन वागणारे. अंगावर काहीतरी जबाबदारी टाकतील असे वाटलेले असे आणि असले बरेचशे. आयुष्यात कधी एका जागी स्थिर राहिलो नाही. खूप सर्कल्स बदलली. जास्त तापमान आणि जास्त दाबाखाली जास्त तास लागणार्‍या प्रक्रिया आयुष्यात कधीच झाल्याच नाहीत. जे काही घडलं ते फटाफट घडलं. माणसांबद्दल मत बनवायला फार काही वेळ नव्हता. आपण फार ओपन आहोत, लिबरल आहोत, फ्रेंडली आहोत असा समज नक्की किती सुयोग्य आहे हे क्रॉसचेक करून पाहावं असं कधी वाटलं नाही. ज्यांच्या भिन्न भिन्न ऋण प्रतिमा आहेत असे कितीतरी चेहरे मी नजरेसमोरून घालतो. मी यश पावतो, माझं काही भलं होतं तेव्हा त्यांच्याकडे एक अवहेलनात्मक कटाक्ष टाकतो नि माझे पाठीराखे, माझ्या गुडबूक्समधली माणसं,जी या विघ्नचिंतकांच्या कितीतरी पट आहेत, ती जोरजोरात हर्षोल्लास करत असतात. हे सगळे उत्सव समारंभ माझ्या मनातल्या स्टेडियममधे होत असतात. आयुष्यात प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी हे स्टेडियम खच्चून भरलेलं असतं. माझे सवंगडी भरपूर जल्लोष करत असतात. तिथली ही दुष्ट लोकांची पराभूत टिम हिरमसून गेलेली असते. माझ्या यशाचं त्यांना दु:ख असल्याची मला पूर्ण खात्री आहे. नि माझ्या बाजूच्या लोकांसमोर, लोकांसोबत त्यांना हिणवताना होणारा आनंद सार्थक आहे असंच मी मानत असतो. असंच मानत मी आयुष्य जगत आलेला असतो, मग ती मंडळी माझ्या दैनंदीन आयुष्यात नसोत नाहीतर या जगात नसोत! अचानक ती न सरणारी रैना मला आठवण करून देते कि ही हारकी टिम तुला कोणी लागत नाही का? किमान त्यातले काही? ती नाठाळ नात बनून किती दिवस राहायचं? कधीतरी त्या आजोबाच्या आत्म्याकडे निरपक्षपणे का नाही पाहायचं? मी पुन्हा त्या विघ्नचिंतकांच्या केसेसच्या फाईल्स उघडतो. बर्‍याच ठिकाणी मला माझा अहंकार, टोकाची प्रतिक्रिया, दाबून ठेवावा लागलेला राग, माहिती नसल्यामुळं करून घेतलेले गैरसमज, पूर्वग्रहदोष, संकुचित अस्मिता, ईर्ष्या, लोभ, स्वार्थ यांची एक तटस्थ म्हणून वकीली करता येत नाही. माझीच काही वर्तनं उघडीनागडी पडलेली दिसतात. रैना मला माझं निरपेक्ष निरीक्षण करण्याची जादूई शक्ती देते. जिथे माझ्याच ऋणगुणांचा परिणाम आहे अशा सगळ्या मंडळीना मी अल्लाद उचलून स्टेडियममधे माझ्या मित्रमंडळींमधेच कुठेतरी अ‍ॅडजस्ट करतो. ईथून पुढे आपण काही साजरं करू तेव्हा ते त्यांच्या नाकावर टिच्चून वैगेरे साजरं करायचं नाही असा निर्धार मी करतो. त्या केसेस मी क्लोज करतो. तरी काही केसेस उरतातच. त्या क्लोज करणं अवघड जातंय हे मला स्पष्ट दिसतंय. ही उरलेली अल्प स्वल्प मंडळी माझ्यासोबतच नव्हे तर जनरलीच दुष्ट असल्याचं मला पक्कं माहित आहे. त्यांना चांगलं मानणं बौद्धिक काँप्रोमाइज ठरेल. तरीही ही मंडळी आनंदानं जगतात, त्यांचं माझ्याइतकंच मोठं सर्कल असतं, कधीकधी त्यांना महाजनपद लाभतं, प्रसिद्धी लाभते , नि आपल्या दुष्टपणाचा कुठला गम त्यांना असल्याचं त्यांना दिसतच नाही. कैकदा मीच त्यांच्यासाठी गौण असतो. त्यांना लाभणारी सुखशांती लाभावी कि लाभू नये याबद्दल मी काय विचार करावा? मी या केसेसचं काय करायचं म्हणून बुचकाळ्यात पडलेलो आहे. रात्र उशिरापर्यंत चढलेली आहे.मी त्यांच्याबाजून विचार करायचाय कि माझ्या यात मला खूप संभ्रम व्हायला लागलाय. ज्यांना जी सहानुभूती द्यायला हवी, न्याय्य स्थान द्यायला हवं ते मी कदाचित देत नसेन म्हणून मी अस्वस्थ होतो आहे. मला काही उत्तर काढता येत नाहीय. एक मात्र कळलं आहे कि नक्की काय करायचं आहे हे जाणण्यासाठी मला माझ्याच आत्म्याचा अधिकचा परिचय हवा आहे.

Sakharam Binder – A Critical Review

Sakharam Binder is a Marathi drama. If this is a unpirated link, you can watch it here.

This is the link for Hindi version:

If possible, please watch the drama end to end. It’s English version also might be available. If possible, read a  couple of reviews. Here is one Review.

There are is a reason why I am writing this review of my own. When I search “Marathi Drama” on the Youtube, this drama which is watched maximum number of times turns out to be the first result. And it shouldn’t have. Yes, that is why I am reviewing it.

Some authors try to bring out the dark shades of human mind to fore and that is their forte. There is nothing wrong in that. But the number of people who are interested in the pervert side of mind, at least openly or more than in the other shades, should be less. There are plenty of Marathi Dramas and great ones too. Katyar Kaljaat Ghusali, the second ranker, is such a classic piece of work. Then why is this drama so famous, so acclaimed? The opponents (not critiques) will say that it is all about successful advertising. Some would say, it is all about creating a controversy and then reaping money out of it. But I am taking whatever the makers of this drama want to say on face value. I don’t want to allege something they won’t accept. I am not among those who fought to ban this drama to protect Indian culture or the caste of men or marriage system or the concept of God or anything like that. My simple contention is that this drama should be liked by a very few people – who are consumers of exploring the dark side of human mind, etc. It unnerves me that MORE people have liked it. And my opposition is only to that effect.

Why would have people watched it? Is it because the drama is very bold? But none of the thoughts in the drama are novel. No human perversion shown in the drama is new!!! This kind of perversion is all pervasive in many art forms as a subject matter. Generally in an art form, there is at least one hero. Here, in this drama, everybody without exception is pervert. May be, that could be the novel angle. But still, it didn’t impress me. The drama reveals perversions of each character one by one. It tends give an impression that the first woman on the screen/stage is religious, pious, virtuous, poor, ethical, hardworking, victimized in prior life as well as from her entry on the stage, etc. But she turns out to be the most pervert, to the shock of audience as well as that of Sakharam binder who is shown father of arrogant, oppressive, suppressive, torturous, lecherous, inhuman god (in the sense the drama shows that he is the only person who can earn on the planet Earth where people have have only two options – tolerate this god Sakharam or die.)

Note that I am not doing art side criticism of this drama. I am completely incompetent for that. I have no issues in agreeing that this drama is a great piece of art so far acting, lights, music, etc is concerned. However, a drama is not all about art. It is about an objective of the makers of it. Looking at the original release time, it doesn’t appear that objective was entirely money making. There was a much bigger objective in earnest. Let me guess what it could be. It could be to give this “artistic shock” in the end to the audience – just like the masseur twists a particular muscle which pains but is considered to be a great massage. I have no issues with this either. The other objective could be to give a message to the society. And this is where I feel there is a deficiency in the drama. The drama should precede or end with a disclaimer that this drama is not representative of any society. Because the drama doesn’t objectively state exactly what message it wants to send. So what is the message that reaches the audience?

The message that reaches an individual is what he wants to draw. And  what inference one draws first of all? The inference is, well, that the drama is depiction of social truth.  Tauba. Tauba. This drama has following people in it – Sakharam, a pious keep, a bold keep, a muslim friend, the bold keep’s (previous) husband. All of them are 100% pervert on overall basis. It doesn’t stop there. None of them thinks that there is anything wrong with himself or herself. None has any remorse of any kind throughout the drama.  Everyone has many criminal tendencies. There is no limit to which the criminal tendency can reach for each of them.

The question is – is the real society like this? Of course not!!! There is dark side to every MIND but when it comes to actual living, civilization ( or naturality) plays its forces.  The makers or watchers of this drama have failed to understand that the dark of of the MIND is not equal the dark side of the REALITY. People behave much better than what worst they can think about. Can a representation of the society of the worsts send a useful message? Giving complete benefit of doubt to the makers, let me explore what are the takeaways for me in this drama. Does the drama talk anything of human nature, attitude of men or women, man-woman relationship or anything like that at universal level? Does the drama talk of any Indian value? I don’t think so.

If the makers imply that they have depicted anything belonging to the real society, they have fooled themselves. Yes, Vijay Tendulkar has befooled himself if he thinks this is the Indian society. But the default audience of this drama is likely to return home thinking that the drama is all about reality of the society. Various comments on the Youtube link as well as discussions in the social forums have revealed to me that audience takes this as real social life which Vijay Tendulkar has intelligently found out and presented. For most, this is not a artistic presentation or the twitch by the masseuse but an excursion in the safari of Mr. Tendulkar in the dark alleys of internally pervert but visibly decent society. Mr. tendulkar is basically lauded for that. And that is a big cheating with the society and media. People may see a Sakharam in every Indian chauvinistic male, people may see a pervert pious keep in every religious woman, people may see a unfaithful and liar keep in every bold Indian wife, people may see a betrayer in every friend like that Muslim character.

Excessive dose of artistic perversion to masses is not desirable. It has two effects:

  1. When you are exposed to excessive badness as an observer, you rate your own goodness on a higher plane than it deserves. You may just forget that you have things to improve about. You may forget that there is scope to improve your moral character. Every coming day we complain of falling human values. That is because if an ordinary person is told that his values are far superior than the wicked society, the only side he would look forward to is downwards. That has happened to the current society by the grace of the great intelligent artists.
  2. When you are exposed to excessive badness, you tend to be suspicious about the character of the others. Because according to you excessive badness means hidden wickedness and false exhibition of goodness by the others to you. So you start doubting. You think that a there could be a lot of bad hidden agenda of a person. So your love for him doesn’t show up voluntarily but it takes pauses. Suppose you watch a movie in which wife cheats on the husband and keeps relations with his very close friend. For a fleeting moment you think in a particular direction about YOUR OWN LIFE (as the context applies, depending upon age, maturity, closeness, etc).

I become sad when people start calling this reality. There were so many people who stood for the Indian culture, who stood for Indian males, who stood for Indian value system, who stood for Indian marriage system and opposed this drama but no one stood for a default decent member of Indian society. I didn’t read even one vehement comment that the drama was classic but the real world is very beautiful.

I think the makers should dissociate this piece of art from social reality through a disclaimer. If the drama was less popular (or even most popular but only as an art), it was not an issue. But it is a hallmark of Marathi and Hindi drama industry and the viewers are made to digest a falsity as a reality of the society under the pretence of tour of unknown corners real life with intelligent guides.

Take it from me, there is more probability of parallel evolution of life on the Moon in a decade than of five perverts of Tendulkar coming together on the planet Earth.